मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी

ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

- उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम

मतदार यादीत आधार क्रमांक जोडणी करणे ऐच्छिक

ठाणे, दि. 15 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार कार्डशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम ठाणे जिल्ह्यात  1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे. आधार क्रमांक जोडणी ऐच्छिक असल्याने जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी, त्यासाठी राजकीय पक्ष, संघटनांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी आज येथे केले.

कालबद्धपद्धतीने मतदारांकडून आधारक्रमांक प्राप्त करून घेण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने सुरू केला आहे. मात्र, मतदान कार्डबरोबर आधार जोडणी ऐच्छिक आहे. या मोहिमेसंबंधी माहिती देण्यासाठी आज राजकीय पक्ष, संघटनांची बैठक श्रीमती कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी श्रीमती कदम यांनी आवाहन केले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अशी होईल नोंदणी

प्रत्येक मतदारांकडून आधार क्रमांक विहीत स्वरूपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. 17 जून 2022 च्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत नाव  असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधारक्रमांक अर्ज क्र.6 ब मध्ये भरून देऊ शकतो. आवश्यक अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध केला जाणार असून अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब  निवडणूक आयोगाच्या विविध माध्यमांवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी विशेष मोहिम दि. 1 ऑगस्ट 2022 पासून होणार आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येने आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. तसेच आगामी गणेशोत्सव, नवरात्रीमध्ये मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.

            याबरोबरच नमुना अर्ज क्र.6,7 व 8 मध्ये 1 ऑगस्ट 2022 पासून सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच नमुना 6 ब नव्याने निर्माण करण्यात आला आहे. सुधारित अर्जानुसारच मतदारांनी मतदार यादीतील बदल अथवा नोंदणीची प्रक्रिया करावी, असे आवाहनही श्रीमती कदम यांनी केले आहे.

            ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या सुमारे 8  लाख 18 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे काही केंद्रांवरील मतदारांची संख्या कमी झाली आहे. तर पलावा सारख्या गृहसंकुलामध्ये एका मतदान केंद्रावर 5 हजार पेक्षा जास्त मतदारांची नोंद झाली आहे. अशा ठिकाणी पाच मतदान केंद्रे मंजुर करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. पुढील दीड वर्षात आणखी मतदार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण करण्यात येणार असल्याचे श्रीमती कदम यांनी यावेळी सांगितले.

00000000

National Doctors Day celebrated in Ryan International School, Ambarnath

RYAN INTERNATIONAL SCHOOL, AMBARNATH
NATIONAL DOCTOR'S DAY 

     National Doctors Day was celebrated in Ryan International School, Ambarnath on 01-07-2022. The Chief guest for the event was Dr. Sandeep Medhe. Sir is the Director of Orkid Children's Hospital, Ulhasnagar. Sir has completed his education from Harvard Medical School, Boston USA, First Hand Advisor - Office of Career services, Harvard University, Specialist in Health Project Monitoring and Evaluation, The World Bank, Washington DC, Advisory Board Member of Institute of Global Health University of California, Panelist, Global Health Work Force 2020-Public Health Institute USA, Competency Sub-Committee Consortium of Universities for Global Health USA, Ex-medical Officer - National Rural Health Mission, Ministry of Health, Government of Maharashtra. An Interactive session of was conducted for Grade IX students on National Doctor’s Day. 
The event started with an introductory speech throwing light on why Doctors day is celebrated by the School President Ms. Gojiri Ghandat followed by the Welcome Speech by the School Prime Minister Ms.Payel Maity.  welcome Song was sung for welcoming the Chief guest. The Chief Guest was Introduced to the students by Ms. Swati Kohli followed the students felicitated the guest with the sapling and the folder. An Interactive Session was conducted where the Doctor shared his views with the students. The Students had prepared a Questionnaire which they asked from the Doctor and discussed about it.
The students were very enlightened to interact with such a dignified personality. Students jotted the points discussed. The session ended with a vote of thanks given by Ms. Chitra Babu the Head of the School. 

एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आज सायंकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. अशी माहितीही या पत्रकार परिषदेत दिली.

शिंदे समर्थक आमदारांस गोळी घालून जीवे मारण्याची धमकी

अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर  यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
आमदार बालाजी तेरेको गोली
मारनेका दिन आ गया हे हामारे 
अंबरनाथ के शिवसेना नेता को
 तकलीफ देता है इसिलिए तुझे 
मारनेका हे बता इसलिये रहा हु 
जब में मारूंगा वह दिन तय हे 
तब तक टू रोज डर डर के जिये
अशा आशयाचे धमकीचे निनावी पत्र  अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे  आमदार बालाजी किणीकर यांना पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच किणीकर यांना ठार मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदे समर्थक एकवटले

अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आ. गुलाबराव पाटील आणि आ. डॉ. बालाजी किणीकर  यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये  एकवटले आणि त्यांनी एकत्र येत  समर्थनार्थ घोषणाबाजी  केली. नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकवटले होते.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर हे देखील त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आहेत. यानंतर दोन दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये आमदार किणीकर यांच्याविरोधात अज्ञातांनी ‘हो मी गद्दार आहे’ असा मजकूर असलेले स्टिकर्स लावले होते. या पार्श्वभूमीवर अंबरनाथमधील शिवसेनेतल्या शिंदे समर्थक गटाने आज शक्तिप्रदर्शन केलं.
शिंदे समर्थकांनी केलेल्या या शक्तिप्रदर्शनावेळी शहरातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, उत्तर भारतीय आघाडीचे शहर संघटक प्रमोदकुमार चौबे, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, माजी नगरसेवक उमेश गुंजाळ यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे समर्थक एकत्र आले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला संपवण्याची सुपारी घेतली असून, शिंदे साहेबांनी याविरोधात केलेल्या बंडाला आमचं समर्थन असल्याचं यावेळी शिंदे समर्थकांनी सांगितलं. 
 

Ryan International School, Ambernath celebrated Investiture ceremony 2022

INVESTITURE CEREMONY 2022-23
        The Investiture ceremony being the most awaited ceremony by the students was celebrated at Ryan International School, Ambernath on 18th June 2022 in order to fulfill our Chairman Sir's vision to inculcate leadership quality in the students. The programme started at 9:00 a.m. The chief guests for the ceremony were Honorable sub Lieutenant of Indian Navy - Sir Suresh Kumar and Indian Army soldier Sir Chidanand Uddesh Wadennavar. 
The programme started by remembering God Almighty by saying the Lord's Prayer, Bible reading followed by  the Special prayer. Then the choir sang the Praise and worship song and students danced on it. The welcome speeches were delivered in English and Hindi followed by the welcome song with the dance. As it is our Chairman Sir's vision that 'Each one plant one', to fulfill this vision the guests were felicitated by giving a sapling with the folders and the badges. Followed all the council members were placed in a disciplined line and as the teacher briefly explained about the School parliament, the march song was played and the Ministers along with the house captains with their flags marched and took their positions for the Badging ceremony. All the ministers were badged by the guests and each one introduced themselves and took the oath while badging. After the badging was done the Prime Minister of the school took the oath along with the other Ministers. The President and the Prime Minister of the school shared their views by giving a speech. Then all the council members escorted to their respective place. The programme was continued with a beautiful cultural dance performed by the students. 
   Both the guests congratulated the newly elected members and gave inspirational speeches which taught them how to be honest in their duties and the importance of healthy lifestyle. Then the vote of thanks was delivered by the students in English and Hindi. The closing chorus was sung and the students performed the dance. The Ryan Song and the National Anthem were sung followed by the photo session of the Council Members with the guests wearing their scarfs and badges holding the saplings which they had brought as a token of their duty towards environment. All were very happy and grateful. It was indeed a moment of pride for Ryan International School, Ambernath. 

वटपौर्णिमे निम्मिताने तुळशीच्या रोपांचे वाटप

 सुवर्णा साटपे यांचा आगळा वेगळा उपक्रम
बदलापूर:  भारतीय संस्कृतीमध्ये वटपोर्णिमा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वटपौर्णिमेच्या सणाला महिला वडाची पूजा करत असतात मात्र गेल्या काही वर्षात वटपौर्णिमेला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे झाडाची पूजा करण्याऐवजी झाडाच्या फांद्या तोडून त्याला फेऱ्या मारण्यात येतात त्यामुळे वटवृक्षाची संख्या कमी होत चालली आहे हीच गरज ओळखून सुवर्णा साटपे यांनी महिलांना दोनशे तुळशी रोपांचे वाटप केले
वट पौर्णिमेला इतिहासात अनन्यासाधारण महात्व आहे. सात जन्म हाच पती मिळावा या साठी महिला वर्ग मोठया प्रमाणात वडाची पूजा करतात उपस- तपास करतात वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घ आयुसाठी प्रयन्त करतात आपल्या श्रद्धेपोटी महिला वर्ग हे वट पौर्णिमेचे व्रत करून हे संस्कार करतात यंदा निम्मिताने निमित्ताने वडाच्या झाडाची पूजा करायला आलेल्या सुमारे 200 पेक्षा अधिक महिलांना तुळशी ची रोपे भेट म्हणून देण्यात आली तुळशीला महिलांच्या जीवनात एक वेगळे स्थान आहे तसे पाहता तुळस ची वनस्पस्ती मानवी जीवनात अतिशय महत्वाचे काम करते तुळस ही मोठया प्रमाणात प्रणवायू देते तुळशीची पाने खाल्याने अनेक रोगापासून मुक्ती मिळू शकते तसेच तुळशीच्या रसाचे सेवन केले तर स्मरणशक्ती वाढते या आणी अश्या अनेक गोष्टीसाठी तुळस उपयुक्त वनस्पती आहे
महिला वर्ग रोज सकाळी तुळशीची पूजा करतात त्यांना त्यावेळी भरपूर प्रणवायू मिळतो प्रत्येक धार्मिक विधी मध्ये तुळस ही लागतेच. मागील वर्षी सुमारे 100 वडाच्या झाडाची रोपे महिलांना भेट म्हणून देण्यात आली होती झाडें लावा, झाडें जगवा त्या मागे हा संदेश होता हल्ली बाजारातून झाडाची एक फांदी विकत आणून महिला घरचेघरी वटपौर्णिमा साजरी करतात त्यासाठी त्यांना मागील वर्षी वडाचे रोप भेट म्हणून दिले होते. वडाची पूजा करायला आलेल्या महिलांना तुळशीचे रोप भेट दिल्याने त्यांच्या मध्ये आनंदाचे व उत्साहचे वातावरण होते त्यांना यावेळी तुळस ही आरोग्यासाठी उपयुक्त वनस्पती आहे हे पटवून देण्यात आले प्रभाग क्र 7 मध्ये दोन ठिकाणी या कार्यमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सौ सुवर्णा सतीश यांचा यांचे हे कार्यक्रम आयोजनाचे दुसरे वर्ष होते..

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...