भारतीय अर्थव्यवस्था आधीच अडचणीत असताना यावर्षी मोदी सरकारचे अर्थसंकल्प महत्त्वाचे होते. यावर्षीच्या अर्थसंकल्पकडे सर्वच नागरिकांचे व व्यवसायिकांचे डोळे खिळून होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडला असून त्यातील काही ठळक 12 मध्ये तुमच्यासमोर ठेवीत आहे.
1. शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी सोळा कलमी कार्यक्रम त्याचबरोबर 2.3 लाख लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे
2. स्वच्छ भारत योजनेसाठी अधिकचे 12300 कोटी रुपयांची तर स्किल इंडिया साठी 3 हजार कोटी रुपयांची तरतूद
3. आरोग्य क्षेत्रासाठी एकूण 70 हजार कोटी तर शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे
4. भारत टीबी मुक्त करण्यासाठी 2025 चे ध्येय ठेवण्यात आले आहे.
5. पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी
महिलांच्या विकासासाठी 28 हजार 600 कोटी
तर आदिवासींच्या विकासासाठी 53 हजार कोटींची तरतूद
6. मुंबई दिल्ली मेगा हायवे 2023 पर्यंत पूर्ण पूर्ण करण्याचे ध्येय असून अधिकचे 3 हजार किलोमीटरच्या कोस्टल रोडची उभारणी करण्यात येणार आहे
7. ओबीसी व एसी विकासासाठी 53 हजार कोटी तर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी 9 हजार 500 कोटी रुपये तरतूद आहे
8. बँकिंग क्षेत्रासाठी 3 लाख 50 हजार कोटीची तरतूद असून बँक व्यवस्थापन सुधारणेकडे लक्ष देणार
9. जम्मू आणि काश्मीर साठी 30 हजार कोटी तर लदाखसाठी 59 हजार कोटी रुपये तरतूद
10. मोठ्या सरकारी कंपन्या बाजारात विक्रीसाठी आणणार असून राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे.
11. मोदी सरकारने 10% विकासदर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे
12. 2019-20 मध्ये देशाचा एकूण खर्च 26.19 लाख कोटी इतका असून कमाई 22.46 लाख कोटी आहे.