मोबाईलचा अतिवापर टाळा

 


मोबाईलचा अतिवापर टाळा आता प्रत्येकाजवळ मोबाइल असणं ही अगदी सर्रास गोष्ट झाली आहे. त्याच्याजवळ मोबाइल नाही असा एखादा विरळाच, पण मोबाइल सगळ्यांजवळ असला तरी योग्य पद्धतीने वापरण्याची सगळ्यांनाच सवय असते असं नाही. कित्येकजण मोबाइलवर इतक्या मोठमोठ्याने बोलत असतात की आजूबाजूच्यांना त्याचा त्रास होत असतो. तरुणींच्या बाबतीत बोलायचं तर बरेचदा मोबाइल पर्समध्ये असेल आणि फोन आल्यावर तो| चटकन घेता आला नाही, तर तो बराच वेळ वाजत राहतो. त्याचा त्रासइतरांना होऊ शकतो, याचं भान ठेवायला हवं. शिवाय बरेचदा फोन उचलेपर्यंत तो समोरच्या व्यक्तीने कटही केलेला असतो. ऑफिसमध्ये असताना तुम्हाला एखादी मीटिंग हँडल करण्याची वेळ बरेचदा येते. अशावेळी मोबाइल बंद करायला किंवा सायलेंट मोडवर करायला विसरु नका; पण मीटिंग किंवा प्रेझेंटेशन सुरू करण्यापूर्वी इतर व्यक्तींनादेखील नम्रपणे तो बंद करण्यास किंवा सायलेंटवर करण्यास सांगा. याशिवाय जर तुम्ही| मीटिंगमध्ये बसला असाल किंवा एखाद-दुसरी व्यक्ती प्रेझेंटेशन करणार असेल, तेव्हाही ही खबरदारी घ्या आणि एखादा महत्त्वाचा कॉल आलाचतर तो मीटिंग रूमच्या बाहेर येऊन अटेंड करा. जेणेकरून तमच्या फोनवर| बोलण्याचा इतरांना त्रास होणार नाही किंवा फोन कट करून समोरच्या व्यक्तीला नंतर फोन करण्यासाठी मेसेज करून सांगा. यावेळीदेखील तुमचा की-पॅडचा टोन ऑफ आहे, याची काळजी घ्या. म्हणजे मेसेज टाईप करतानात्याचा आवाज होणार नाही.याचप्रमाणे इंटरव्ह्यूसाठी जाताना मोबाइल सायलेंटवर ठेवा किंवा स्वीच ऑफ करा. इंटरव्ह्यूची वाट पहात असताना कॉल आला तर हळू आवाजात बोला आणि कामापुरतेच बोला. कारण त्याच वेळेला तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावले गेल्यास तुम्ही गडबडून जाण्याची शक्यता असते. तसेच जर तुम्ही मोबाइल सायलेंटवर करायला विसरलात आणि इंटरव्ह्यूच्यामध्ये तुमचा फोन वाजला तर, 'एक्सक्यूज मी' असं म्हणूनच कॉल कट करा; पण असे करण्यापेक्षा तो आधीच बंद किंवा सायलेंट करणे श्रेयस्कर. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूत असताना डिस्टर्ब होणार नाही. कारण लक्षात ठेवा तुमच्याजवळ हाच अर्धा ते एक तास असतो ज्यात तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असते.तसंच वाहन चालवत असाल, तर शक्यतो गाणी ऐकणे व फोनवर बोलणे टाळा.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...