दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने सुरक्षित प्रभागासाठी हालचाली सुरू

बदलापूर पालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागाचे आरक्षण जाहीर झाले आहे . यात सर्वच पक्षाच्या बहुतेक दिग्गज सदस्यांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. आता त्यांना दुसरा प्रभागात जावे लागण्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरवात झाली आहे.
आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी आर. व्ही. थोटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पार पडली. मुख्याधिकारी प्रकाश बोरसे, निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी यांनी सहकार्य केले. शाळेच्या विध्यार्थ्याने सोडतीच्या चिठया काढल्या.
विद्यमान नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांचा प्रभाग अनुसूचित जामातींत महिलांसाठी आरक्षित झाला आहे. माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे गटनेचे राजेंद्र घोरपडे याचा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला. तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शरद तेली, संभाजी शिंदे, संजय भोईर, शिवसेनेचे मुकुंद भोईर, श्रीधर पाटील, अरूण सुरवळ यांचेही प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरप्रमुख आणि नगरसेवक आशिष दामले यांचा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे. माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा प्रभाग मात्र सर्वसाधारण राहिला आहे. या आरक्षणांमुळे दिग्गज नगरसेवकांनी सुरक्षित प्रभागासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या आरक्षण सोडती संबंधी सूचना वा हरकती घेण्यासाठी चार मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्यांना सूचना वा हरकती घ्यायच्या असतील त्यांनी लेखी स्वरूपात द्याव्यात असे आवाहन उपजिल्हाधीकारी आर. व्ही. थोटे यांनी केले आहे.
बदलापूर शहरात एकूण ४७ प्रभाग आहेत. अनुसूचित जमाती साठी दोन प्रभाग त्यातील एक महिलांसाठी. अनुसूचित जातीसाठी ७ प्रभाग आरक्षित असून त्यातील ४ महिलांसाठी आरक्षित आहेत. नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग करीता १३ प्रभाग आरक्षित असून त्यातील ७ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी १२ प्रभाग आरक्षित ठेवण्यात आले आहेत.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...