राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेचं ५५ जागांसाठी निवडून जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील ७ जागांसह १७ राज्यातील ५५ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल पाहिल्यात संपुष्टात येणार आहे.
राज्यसभेच्या ५५ जागांसाठी निवडणूक होणार असूनत्या साथीचे अर्ज ६ मार्च पासून स्वीकारले जाणारा आहेत. १३ मार्च पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येतील त्यानंतर १६ मार्च रोजी त्या अर्जाची छाननी केली जाईल. तर १८ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. त्यानंतर २६ तारखेला संबंधित जागांसाठी निवडणूक होतील. सकाळी ९ ते ४ या वेळेत खासदारांना मतदान करता येईल. त्यानंतर संद्याकाळी ५ च्या सुमारास निर्वाचित उमेदवारांची घोषणा होणार आहे. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार असल्याने महाराष्ट्राचे गणित बदलेले असण्याची शक्यता आहे. महारष्ट्रातून सर्वाधिक म्हणजेच ७ जागांसाठी निवडणूक होणार आहेत.
ह्या वरिष्ठ नेत्यांचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे
दिग्विजय सिंह (मध्य प्रदेश), मोतीलाल वोरा (छत्तीसगढ़), कुमारी शैलजा (हरियाणा), विप्लव ठाकुर (हिमाचल प्रदेश), मधुसूदन मिस्त्री (गुजरात), रामदास आठवले (महाराष्ट्र), परिमल नाथवानी, प्रेम चंद्र गुप्ता (झारखंड), विजय गोयल (रेटिंग) आणि डीएमकेचे थरूची शिवा.