बदलापूर : १८ फेब्रुवारी रोजी घोषित होणारी प्रभाग रचना सह आरक्षनाची तारीख लांबल्याने इच्छुक उमेदवारांसह नगरसेवकांची उत्सुकता शिगेला पहोचली आहे. राजकीय गणित मांडण्यासाठी व कर्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यात येणारी अस्पष्ट्टता हे या मागचे प्रमुख कारण आहे.
निवडणुकीच्या प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार कुळगांव बदलापूर नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचना अहवाल तयार करुन निवडणुक आयोगास सादर केला. नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडुन प्राप्त प्रारुप अहवालास १५ फेब्रुवारी पर्यंत मान्यता देणे अपेक्षित होते. राज्य निवडणुक आयोगाने प्रभाग रचनेस मान्यता दिल्यानंतर प्रभाग रचनेसह प्रभाग आरक्षण जाहिर होणार होते. परंतु ते जाहिर झाले नाही. त्यामुळे बदलापूर मधील नगरपालिका निवडणुकीचा गोंधळ वाढला आहे. कोणता प्रभाग आरक्षित होणार, कोणता प्रभाग महिलांकरिता आरक्षित होणार, कोणता प्रभाग खुला होणार याबाबत विविध चर्चांना उधान आले आहे.
काही दिग्गजांचे प्रभाग आरक्षित होणार, प्रभाग आरक्षित झाल्यानंतर तो नगरसेवक अथवा ती दिग्गज व्यक्ती कोणत्या प्रभागातुन उभी राहणार अशा एक ना अनेक चर्चांनी बदलापुरच्या राजकिय वर्तुळ आणि सोशल मिडिया ढवळुन निघाले आहे. राजकीय जुळवाजुळव व पक्षाचे गणित मांडण्यात उशीर होत असल्याने सर्व राजकिय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.