आज मूकनायकाची गरज प्रकर्षणाने जाणवते – आशिष दामले

बदलापूर :- आजपासून १०० वर्षांपूर्वी, म्हणजे ३१ जानेवारी १९२० रोजी, डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’ हे त्यांचं पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं होतं.त्यानिमित्ताने प्रेस क्लब ऑफ बदलापूरच्या वतीने मूकनायक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रेस क्लब ऑफ बदलापूर वतीने गेल्या सात वर्षापासून दरवर्षी मुकनायक दिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो मुकनायक दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेची माहिती विविध कार्यक्रमाच्या रूपाने देण्यात येते.यंदा शारदा अभ्यासिका मध्ये अभ्यासिकेत अभ्यास करणारे यूपीएससी एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसोबत मूकनायक दिन साजरा करण्यात आला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शारदा अभ्यासिकेचे संचालक व नगरसेवक कॅप्टन आशिष दामले हे उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की,समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक सुरू केले. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. या गोष्टीला १०० वर्ष पूर्ण होत आहेत.२०२० हे मूकनायक पाक्षिकाचे शताब्दी वर्ष आहे, पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे  डॉ.बाबासाहेबाना नेहमी वाटत असे. आज मूकनायकाची गरज प्रकर्षणाने जाणवते तसेच युपीएससी, एमपीएससी सारख्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधने आणि त्यांच्या बरोबर कार्यक्रम करणे हा खूपच प्रेरणादायी अनुभव होता.असेही प्रेस का बदलापूर संस्थापक अध्यक्ष संजय साळुंखे यांनी मूकनायक पाक्षिका बद्दल माहिती दिली तसेच भारतीय संविधान उद्देशीकेचे सामूहिक वाचन ही यावेळी करण्यात आले.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...