सैराट चित्रपटातून आपला करिष्मा दाखवणारे दिग्दर्शक आपल्या आगामी 'झुंड' या चित्रपटच्या पोस्ट प्रोडकशन मध्ये व्यस्थ असताना. शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या आगामी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपाटावर आधारित त्रिलंपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. 'शिवाजी' 'राजा शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी' अश्या तीन वेगवेगळ्या चित्रपटामधून आपली कला ते सादर करणार आहेत.
९ मे रोजी बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात १९ फेब्रुवारीच्या औचित्य साधून त्यांनी २०२१ मध्ये येऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केली. ह्यात रितेश देशमुख व अजय अतुल हे निर्मात्यांच्या भूमिकेत असतील. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार या कडे सगळ्यांचं लक्ष खिळून आहे.
तान्हाजी , पावनखिंड, हंबीरराव मोहिते यांच्या जीवनपटांनांतर महाराजांच्या चित्रपटाची घोषणा होणे हि माहाराष्ट्रीयन व देशभरातल्या इतिहासप्रेमींसाठी पर्वणी ठरली आहे. नागराज मंजुळेंसारखा कसलेला दिग्दर्शक असल्याने चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीत उतरेल.
नागराज मंजुळे साकारणार 'शिवत्रयी'