बदलापुरात साकारली शनिवार वाड्याची प्रतिकृती


बदलापूर – शनिवार वाडा म्हटले की आपकुसच पुण्याची आठवण येतेहाच शनिवार वाडा आता बदलापुरात  पाहायला मिळत  आहे. बदलापूर येथील स्टेशन पाडा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाने यंदा माघी  गणेशोत्सवनिमित्ताने पुणे येथील प्रसिद्ध असलेला शनिवार वाड्याची प्रतिकृती साकारली आहे. नारळाच्या नवसाला पावणारा  महा गणपती आणि बदलापूरचा महाराजा अशी ख्याती असलेल्या स्टेशनपाडा माघी गणेशोत्सव  मंडळ यंदा 52 व्या वर्षात पदार्पण आहे.  माघी गणेशोत्सवात दरवर्षी आकर्षक देखावे सादर करणाऱ्या या मंडळाने यंदा पुण्याचा प्रसिद्ध शनिवारवाडा साकारला  आहे. 


 बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरील  पूर्व भागातील जागेमध्ये गेल्या 51 वर्षांपासून भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे भव्य मिरवणुकीने वाजतगाजत मिरवणुकींनंतर श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.  सुप्रसिद्ध सजावटकार नीती देसाई यांच्या संकल्पनेतून शनिवार वाडा साकारला  आहे.




ठाणे जिल्ह्यातील जुना माघी गणेशोत्सव  अशी  गणेशोत्सवाची ख्याती  असल्याने  रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोलीसह ठाणे जिल्हा आणि मुंबईतील भाविक उत्सवादरम्यान बदलापूरात हजेरी लावतात, उत्सवाच्या कालावधीत बदलापूरला जत्रेचे स्वरूप येते.



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...