सरकारी कर्मचाऱ्यांना आता रोज जास्त काम

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतल्यानंतर आज त्याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामाची वेळ पाऊण तासानं वाढवण्यात आली आहे. त्यामुळं आता सरकारी कार्यालयं दररोज सव्वा सहा वाजता सुटणार आहेत.

पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या उर्वरीत दिवसांतील कामकाजाच्या वेळेत वाढ होणार, अशी चर्चा होती. ती खरी ठरली आहे. आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात सर्व कामकाजाचे नवे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. दिनांक २९ फेब्रुवारी, २०२० पासून 'फाइव्ह डे वीक'चा नवा निर्णय लागू करण्यात आल्याचं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू होत नसलेल्या सरकारी कार्यालयांची यादीही शासन निर्णयासोबत देण्यात आली आहे.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...