शिक्षण हक्क कायदा अंतर्गत 2020-21 या वर्षाकरिता प्राथमिक शिक्षणाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून 11 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत पालकांना अर्ज करता येणार आहे.
समाजातील दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना दर्जेदार शालेय शिक्षण विनामूल्य मिळावे यासाठी सरकारच्या वतीने या घटकातील बालकांसाठी इयत्ता पहिलीच्या एकूण प्रस्तावित जागांपैकी 25% जागा या शाळास्तरावर राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार दोन हजार वीस एकवीस शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाइन पद्धतीची प्रवेश प्रक्रिया 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पालकांना आपल्या पाल्याचे ऑनलाइन प्रवेश पद्धतीने प्रवेश अर्ज भरताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पार पाडल्यानंतर 11 व 12 मार्च दरम्यान पहिली यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 16 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान शाळेत प्रवेश घ्यावा लागेल. 4 टप्प्यात ही प्रतिक्षा यादी पार पडणार असून 13 एप्रिल ते 22 मे या कालावधीत हे चार टप्पे पार पाडले जातील. इच्छुक पालकांनी अर्ज करण्यासाठी सरकारच्या rte25admission.maharashtra.gov.in संकेत स्थळावर भरता येणार आहे.