पहिली बाष्पक परिषद बाष्पक क्षेत्राशी संबंधीत सर्वाना उपयुक्त ठरेल

 


ठाणे : राज्य सरकारच्या बाष्पक संचालनालयामार्फत देशात प्रथमच बाष्पक परिषद होत आहे.ही परिषद बाष्पक क्षेत्राशी संबंधीत सर्वाना उपयुक्त ठरेल असा विश्वास  कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.  या परिषदेच्या उद्घाटन श्री वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. 


 यावेळी  संचालक, बाष्पके संचालक  धवल  अंतापूरकर, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सचिव केंद्रीय बाष्पके मंडळ नवी दिल्ली श्री. टि. एस. जी. नारायण,प्रधान सचिव कामगार राजेश कुमार,विवेक भाटीया उन्नी कृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते.


 बाष्पके तपासणीला सुरवात होवून 15 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने तीन दिवसीय परिषदेचे आयोजन वाशी येथिल सिडको भवन येथे  करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देशभरातील  कंपन्यांनी  सहभाग घेतला आहे. तर चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यासाठी देश विदेशातील वक्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी बोलतांना  श्री वळसे पाटील म्हणाले


बाष्पकेंचा वापर होत असताना त्याबाबतीतले पुरेपुर ज्ञान  आवश्यक आहे. बाष्पकाच्या वापरावेळी योग्यती खबरदारी घेतल्यास दुर्घटना टळू शकतात. या परिषदेमुळे संबंधितांना सविस्तर माहिती होणार आहे.


कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी देखिल बाष्पक क्षेत्रला चालणा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत, त्याच उद्देशाने हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगितले. सद्या बाष्पकाच्या वापरामध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून सुमारे साडेतीन हजार कंपण्यांमध्ये 4525 बाष्पके (बॉयलर) वापरले जात असल्याचे सांगितले.  त्याच उद्देशाने बाष्पक निर्मिती करणारे, वापर करणारे व बाष्पक क्षेत्रत नोकरीच्या शोधात असणारयांच्या मार्गदर्शनासाठी हे चर्चासत्र भरवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.


0000000


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...