मोटर वूमन मनीषा म्हस्के यांचा भाजपाने केला गौरव

बदलापूर मधील कात्रप परिसरातील “मनीषा म्हस्के( घोरपडे)” यांनी पहिल्या वातानुकूलित लोकलचे सारथ्य केले, आणि बदलापूरच्या शिरपेचात आणखी मानाचा एक तुरा रोवला गेला त्यानिमित्ताने बदलापूर भाजप च्या वतीने त्यांचा भाजप चे मा. शहराध्यक्ष तथा नगरसेवक संभाजी शिंदे यांनी अभिनंदन केले.


मध्य रेल्वेच्या पहिल्या वातानुकूलित लोकलचे गुरुवारी 30 जानेवारी रोजी पनवेल ते ठाणे या ट्रान्सफर मार्गावर उद्घाटन करण्यात आले. या लोकलचे सारथ्य केले ते बदलापूरच्या मोटारवूमन मनीषा मस्के यांनी. अत्यंत सामान्य कुटुंबातून उत्तुंग भरारी घेणाऱ्या आणि उल्हासनगर मध्ये माहेर असणाऱ्या मनीषा मस्के या मध्य रेल्वेच्या ट्रान्स हरभर मार्गावर लोकोपायलातची ड्यूटी बजावतात. त्यांच्या समावेशा नंतर मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजन मध्ये एकूण तीन महिलांचा लोकोपायलट म्हणून समावेश झाला आहे. आपले इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लोकोपायलटच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. पुरुषी समजल्या जाणाऱ्या या नोकरीमध्ये आपला वेगळा ठसा उमटवण्यात मनीषा मस्के यांना यश आले आहे.
उद्घाटनाच्या वेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकलला हिरवा कंदील दाखवला.
आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. मनीषा म्हस्केसारख्या महिला फक्त बदलापूरातील नव्हे तर संपूर्ण भारतातील महिलांसाठी एक आदर्श ठरले आहेत.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...