मुंबई : – गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारं बाॅलिवूडमधील अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा पुढील महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत अशा चर्चा सुरु होत्या. परंतु आता या चर्चेबाबत या जोडप्याच्या निकटवर्तीयांनी मलायका आणि अर्जुन यांच्या विवाहाबंद्दलच्या चर्चांना दुजोरा दिला आहे. शिवाय ते पुढील महिन्यातच (एप्रिल) विवाहबंधनात अडकणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मलायका आणि अर्जुन 19 एप्रिलला लग्नगाठ बांधणार आहेत असं म्हटलं जात आहे. स्पाॅटबाॅय ईच्या माहितीनुसार, मलायका अर्जुन हे एप्रिल 19 ला लग्नाच्या बेडीत अडकतील. मुख्य म्हणजे या विवाहासाठी मलायका आणि अर्जुन यांचे निकटवर्तीयच केवळ उपस्थित असणार आहेत असेही समजत आहे. इतकेच नाही तर या यादीत करिष्मा, करीना, दीपिका, रणवीर या कलाकारांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. मलायका आणि अर्जुन दोघंही ख्रिश्चन पद्धतीनं लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
मलायका अरोरा हिने तिचा पती अरबाज खानसोबत 2017 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करू लागली. 2018 मध्ये मलायका आणि अर्जुनचे मिलानमधले फोटो इंटरनेटवर लीक झाले होते. मिलानच्या रस्त्यावर हातात हात घालून फिरणाऱ्या या जोडप्याच्या अफेरच्या चर्चेला तेव्हापासून उधाण आल्याचे दिसले. मलायका आणि अर्जुन दोघंही अनेकदा एकत्र पहायला मिळतात मात्र या दोघांनी कधीही आपल्या नात्याची कबुली दिली नाही. ही जोडी 19 एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकणार अशी चर्चा असली तरी दोघांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.