पालिकेचे आरक्षण जाहीर : दिग्गजांचे प्रभाग आरक्षित

बदलापूर पालिकेच्या येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक साठी प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम  आदर्श महाविद्यालयाच्या भव्य सभागृहात संपन्न झाला. अंबरनाथ  बदलापुर  महापालिकेच्या स्थापनेपूर्वीचीही ही शेवटची निवडणूक असल्याचे बोलले जाते.  त्यामुळे सुरूवातीपासूनच या सोडतीबद्दल उत्सुकता होती. निवडणुक आयोगाने नव्याने जारी केलेल्या निकषांनुसार 2005, 2010, 2015  च्या पालिका निवडणुकांच्या आरक्षणाला ग्राह्य धरत चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.  बदलापूर पालिकेच्या प्रभागांतील आरक्षणासाठीही मंगळवारी दुपारी 3 वाजता आदर्श विद्यालयाच्या सभागृहात सोडत पार पडली.  या सोडतीत विद्यमान नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांचा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी तर माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे गटनेचे राजेंद्र घोरपडे याचा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला. तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शरद तेली,  संभाजी शिंदे,  संजय भोईर,  शिवसेनेचे मुकुंद भोईर, श्रीधर पाटील, अरूण सुरवळ यांचेही प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरप्रमुख आणि नगरसेवक आशिष दामले यांचा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे. माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा प्रभाग मात्र सर्वसाधारण राहिला आहे. या आरक्षणांमुळे दिग्गज नगरसेवकांनी सुरक्षित प्रभागासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 

  पालिकेचे एकूण 47 प्रभाग आहेत. अनुसूचित जमाती साठी दोन प्रभाग असून त्यात एक महिला. अनुसूचित जाती साठी सात प्रभाग असून त्यात चार महिलांसाठी आहेत. नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी तेरा प्रभाग असून त्यात सात महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी बारा तर सर्वसाधारण वर्गासाठी तेरा प्रभाग राहिले आहेत. 

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...