बाबा आमटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त यंदाही बदलापुरच्या सत्कर्म परिवारातर्फे समतीगंध या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या ११ वर्षांपासून सुरू असलेल्या दरवर्षी आपासच्या परिसरात दुर्लक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेला अर्थसहाय्य देण्यात येते. यंदाच्या वर्षात अब अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी भागात काम करणाऱ्या दहिवली येथील युवा संस्कार बहुउद्देशिय संस्थेला अर्थसहाय्य देण्यात , आले. आदिवासी मुलांसाठी रात्र अभ्यास वर्ग, शैक्षणिक साहित्य पुरवणे, आदिवासींच्या आरोग्य आणि कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थेच्या सोमनाथ राऊत यांना यावेळी विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते मदत देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत आणि पर्यावरण तज्ञ विश्वंभर चौधरी यांचा मक्त संवाद आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना चौधरी यांनी भारताचे संविधान, सध्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेला वाद, राष्ट्रीय नेत्यांबाबत पसरवले जाणार गैरसमज नेत्यांबाबत पसरवले जाणार गैरसमज, समाजमाध्यमे अशा विविध विषयांना हात घातला. भारताचे संविधान डोळसपणे पाहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. वैज्ञानिक दृष्टीकोनाशिवाय देशाचे प्रश्न सुटणार नाही. धर्मापासून विज्ञानाकडे वळालल्या दशाचा प्रगता आपल्याला आज पहायला मिळते. त्या तुलनेत आपल्या देशात वैज्ञानिक दृष्टीकोन तयार झाला नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. देशातील समाज हिंस्र मानसिकतेकडे वळतो आहे. लोकप्रतिनिधी वर्धाच्या घटनेचा निकाल हैद्राबादच्या चकमकीप्रमाणे करण्याची मागणी करतात. मात्र हे विधिमंडळाचे नैराश्य आहे. विधिमंडळाने कायदे कठोर करावेत. न्यायिक मानक आणि उत्तरदायित्व विधेयक २०१२ पासून रखडलेले आहे. त्यामुळे अनेक निर्णयांवर परिणाम होतो आहे. राज्यघटनेची पुजा नको तर अंमलबजावणी करावी, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. धर्म आज रस्त्यावर आला आहे. हा हैदोस आणखी किती काळ होऊ द्यायचा हेही ठरवावे लागेल, असेही ते म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत एखाद्या समाजात संभ्रम असेल तर तो ठामपणे भूमिका घेऊन दूर करण्याचे काम सरकारचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बदलापुरातील बाबा आमटे यांचे अनुयायी मोठी संख्येने उपस्थित होतेय.