कविता घाणेकरला 'शिवछत्रपती' पुरस्कार

 


 


बदलापूर - शिवभक्त विद्यालयाची विद्यार्थिनी कविता प्रभाकर घाणेकर सन २०१८-१९ चा महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती पुरसकार जाहीर झाला आहे.वडवली, शांती नगर या ठिकाणी गरीब व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घरातील शिवभक्त विद्यालयाची विद्यार्थिनी कविता घाणेकरला  महाराष्ट्र सरकारचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडूंना देण्यात येणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवारी, २२ फेब्रुवारीला मुंबईच्या 'गेटवे ऑफ इंडिया' येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. बदलापरातील शिवभक्त विद्यालयास दसऱ्यांदा हा परस्कार मिळाला आहे. याआधी मीनल वासदेव भोईर हिला सन २०१६ - १७ वर्षीचा "शिवछत्रपती पुरसकार'' मिळाला होता. शिक्षक, विद्यार्थी, पालक पूर्ण बदलापूर व ठाणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशिक्षक. मेंगळ सर व  म्हस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सकाळ संध्याकाळ तीन तास सराव करून तिने हे यश संपादन केले आहे. संघाच्या सदैव पाठीशी उभे असणारे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हात्रे, (अध्यक्ष- कोकण विभाग शिक्षक सेना व ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ), तसेच संस्थेचे अध्यक्ष वामन म्हात्रे, (माजी नगराध्यक्ष कु.ब.न.प), तुकाराम म्हात्रे, (नगरसेवक ) यांनी कविता प्रभाकर घाणेकर, प्रशिक्षक  मेंगळ सर म्हस्कर सर यांचे अभिनंदन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. . या बदलापूर शहरात दुसऱ्यांदा शिवछत्रपती पुरस्कार मिळल्याने शिवभक्त विद्यालयाचे कौतुक स्तरातून होत आहे.


कामगिरीचा थोडक्यात आढावा  :


१) ईला पुरस्कार (झारखंड), २) जानकी पुरस्कार (ओडिसा)३) नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व (पाच लाख रुपयाचे पारितोषिक) ४) सध्या एअरपोर्ट संघाकडून खेळत आहेमहिना पंचवीस हजार रुपये वेतन दिले जाते) ५) १३ वेळा ठाणे जिल्ह्याच्या संघाचे प्रतिनिधित्व ६) ३ वेळा ठाणे जिल्ह्याची कर्णधार ७) १३ वेळा महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व ८) ३ वेळा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषविले


महिला गट सीनियर राष्ट्रीय स्पर्धा -  १) २०१४-१५ बेंगलोर / कर्नाटक - सुवर्णपदक२)


2)२०१५ - १६ सोलापूर / महाराष्ट्र - सुवर्णपदक,


३)२०१६ - १७ नागपुर / महाराष्ट्र - सुवर्णपदक,


४) २०१७ - १८ कोल्हापूर / महाराष्ट - सुवर्णपदक,


५) २०१८ - १९ जयपुर | राजस्थान - सुवर्णपदक



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...