वांगणी महोत्सवाच्या निमित्ताने गुणवंतांचा सत्कार

 








बदलापूर :  वांगणी महोत्सवाच्या निमित्ताने वांगणी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा तसेच महोत्सवात आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


          वांगणीच्या महात्मा फुले विद्या मंदिर, विद्या विकास शाळा, मौनी बाबा शाळा, डॉल्फिन शाळा, कॅलीबर शाळा या शाळेत १० वीत प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वांगणी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
तसेच स्पर्धा 

परीक्षेत सुयश मिळवणाऱ्या प्रणाली नंदादीप भोईर, वांगणीतील प्रथम सीए मयुर शिंदे, द्वितीय सी. ए. अश्विन  इसकर यांना वांगणी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. वांगणी ग्रामपंचायत सफाई कर्मचारी व मुकादम यांना वांगणी स्वच्छता दुत पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोहन जाधव यांना वांगणी क्रिकेट रत्न तर सचिन केवणे यांना वांगणी परिसर क्रिकेट रत्न पुरस्कार देण्यात आला.

 

वांगणी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज कडव यांचा सत्कार करण्यात आला. 

         
वांगणी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित 

सोलो डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा, मि.आणि मिस वांगणी युवा व युवती स्पर्धा, गायन स्पर्धा, या स्पर्धेच्या विजेत्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्याची माहिती वांगणी महोत्सवाचे आयोजक सागर पारकर यांनी दिली. वांगणी महोत्सवाच्या निमित्ताने 'या वहिनी, घेऊन जा पैठणी' या कार्यक्रमात स्टार प्रवाह वाहिनीवरील पुढचं पाऊल फेम तुक्या अर्थात सागर मिठबावकर व अंकित गायकवाड यांनी हजेरी लावली होती.









Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...