स्मृतिगंध ‘२०, विश्वंभर चौधरी साधणार बदलापूरकारांशी संवाद

बाबा आमटे यांच्या कार्याची प्रेरणा माणसामाणसात जिवंत व्हावी तसेच बाबांच्या विचारांचा विचारांवर कार्य करत असलेल्या व्यक्ती व संस्था यांचा परिचय ठेवून ‘सत्कर्म परिवार बदलापूर’ 2010 सालापासून बाबा आमटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्मृतीगंध’ या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. बाबा आमटेंच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त या ही वर्षी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे ती लेखक आणि सामाजिक व पर्यावरण विषयातील तज्ज्ञ विश्वंभर चौधरी. या कार्यक्रमात विविध विषयांवर विचारमंथन केले जाणार आहे.
बाबा आमटेंनी दाखवलेल्या समाजसेवेच्या वाटेवर चालत असताना, सत्कर्म परिवार दरवर्षी समाज उपयोगी कराक्रम राबवत असते. दरवर्षी प्रमांणे याही वर्षी बाबा आमटेंच्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाज उपयोगी व समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था दहिवली, टिटवाळा या संस्थेचा परिचय करून त्याना अल्पसाहाय्य करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रमात विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान व मुक्त संवाद आयोजित करण्यात आला आहे. विश्वम्भर चौधरी हे महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंतापैकी एक आहेत. अण्णा हजारेंची भ्रष्टाचार विरोधी चळवळ, व मेधा पाटकरांच्या अनेक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. वृत्तपत्रे व डिबेट मार्फत ते आपले विचार प्रकर्षाने मांडत आले आहेत. राजकीय, सामाजिक, पर्यावरण, इतिहास, आंतरराष्ट्रीय संबध अश्या अनेक विषयांवर त्यांचा हातखंडा आहे. स्मृतिगंध २०२० हा उपक्रम बदलापुरात येत असून ही बुद्धिजीवींसाठी एकप्रकारची मेजवानीच ठरणार आहे. बदलापूरमधील पाटील मंगल कार्यालय येथे रविवारी दिनांक ०९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...