खासदार कपिल पाटील चषकात क्रिकेटपटूंना २५ बाईकचे बक्षीस, नारायण राणे यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन

 

 

भिवंडी,: सिद्धीविनायक क्रिकेट क्लब, अंजूर आणि खासदार कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक २०२० मध्ये क्रिकेटपटूंना चक्क २५ मोटारसायकल (बाईक) व खासदार चषक बक्षीस दिला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, गणेश नाईक यांच्या हस्ते रविवारी (ता. २३) स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
अंजूर येथील मैदानावर रविवारी सायंकाळी सहा वाजता सुरू होणारी ही स्पर्धा ५ मार्चपर्यंत रंगणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, खासदार कपिल पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. ठाणे जिल्ह्यात प्रथमच क्रिकेट स्पर्धेत २५ बाईकचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे दर्जेदार संघांमध्ये होणाऱ्या लढती चुरशीच्या ठरतील. भिवंडीसह ठाणे जिल्ह्यातील क्रीडा रसिकांना ही पर्वणी उपलब्ध होत आहे.
या वेळी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, ज्येष्ठ नेते शांताराम भोईर, वसंत पाटील, छत्रपती पाटील, मोहन अंधेरे, रामनाथ पाटील, हरिश्चंद्र पाटील, दशरथ पाटील, महादू घाटाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, निलेश गुरव, जिल्हा परिषदेच्या सभापती सपना भोईर, भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रविना जाधव, श्रेया गायकर, श्रीकांत गायकर, कैलास जाधव, जयवंत पाटील, दयानंद पाटील, अरुण भोईर, अशोक घरत, सगीना बेग, प्रमोद पाटील, पप्पू खंडागळे आदी उपस्थित राहणार आहेत.
 

 


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...