स्वरा भस्कर का होतेय विनोदाचा भाग

 राजकीय घडामोडींवर नेहमीच मत व्यक्त करणारी अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात ती बोलत असते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधातील अनेक मोर्चात स्वरा सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील ती तिची भूमिका मांडत असते. त्यामुळं एका वाहिनीच्या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी स्वराला आमंत्रित करण्यात आलं होतं. या दरम्यानं स्वरानं केलेल्या विधानामुळं ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

टीव्हीवरील एका वाहिनीवर स्वरानं 'हिंदुस्थान शिखर' संगम या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान स्वराला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी, एनपीआरसंर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्या सर्व प्रश्नांची स्वरानं उत्तरंही दिली. मात्र एका प्रश्नाचं उत्तर देताना स्वराचा चांगलाच गोंधळ उडाला. शोच्या निवेदिकेनं २०१०मध्ये देखील एनपीआरसाठी प्रयत्न झाले होते, तेव्हा आवाज का उठवला नाही असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर स्वरा गोंधळून गेली. या प्रश्नावर उत्तर देताना स्वरा ओघाओघात 'तेव्हा तर मी केवळ १५ वर्षांची होते', असं बोलून गेली. अन् नेटकऱ्यांनी हाच मुद्दा उचलला. या मुद्द्यावर स्वराला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...