बदलापूरात ७७ ठिकाणी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवणार 

बदलापूर, :-  शहारातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या गुहविभागाच्या वतीने हि यंत्रणा उभी रहाणार असल्याची माहिती कुळगाव -बदलापूर नगरपरिषदेच्या अभियंत्याने दिली आहे कुळगाव -बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यासाठी पाच कोटीची तरतूद केली होती यासाठी तयार करण्यात आलेल्या डीपीआर नुसार बदलापूर शहरात ३५ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार होत. नगर परिषदेच्या विकासकामांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तांत्रिक मंजुरी देत असते. मात्र यासाठी आयटी विभागाकडून मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आल्याने | नगर परिषदेने पोलिसांशी संपर्क साधला. राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत ठाणे जिल्ह्यात अनेक शहरात अशा प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत आता बदलापूर शहरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या अभियंत्यांनी सांगितले. जानेवारी महिन्यात कुळगाव बदलापूर नगर परिषद, स्थानिक पोलीस व शासनाच्या गृह विभागाचे कन्सल्टंट यांनी बदलापूर शहरात संयुक्त पाहणी दौरा केला. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शहरातील ७७ स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. बारीक नजर ठेवण्याच्या उद्देशाने शहातील मुख्य चौकात ७७ ठिकाणी शासनाचे कन्सल्टंट या कामाचा डीपीआर तयार करणार असून गृह विभागाची मंजुरी घेऊन गृह विभागाच्या आयटी विभागाकडून तांत्रिक मंजुरी घेऊन या कामासाठी शासनाकडून निविदा काढण्यात येणार असल्याचेही या अभियंत्यांनी स्पष्ट केले.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...