पाच दिवस बदलापूर महोत्सवाचे आयोजन

 बदलापूर : शिवसेना शहर शाखा व शिवभक्त प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी शुक्रवार १४ फेब्रुवारी ते मंगळवार १८ फेब्रुवारी दरम्यान बदलापूर महोत्सवाचे आयोजन केले आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन शहरातील सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एका चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरवासीयांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी यासाठी या महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सर्व बदलापूरकरांनी या महोत्सवाला उपस्थिती लावावी असे आवाहन आयोजक वामन म्हात्रे यांनी केले आहे. बदलापूर महोत्सवाचे उद्घाटन १४ पेब्रुवारी रोजी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते होणार असून या दिवशी नंदेश उमप यांच्या मी मराठी या मराठी गितांचा बहारदार कार्यक्रम बदलापूरकरांना अनुभवता येणार आहे. तारका लावणी या कार्यक्रमाने कार्यक्रमाचे आयोजन १५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. रविवारी १६ फेब्रुवारी रोजी बॉलिवड नाइटस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ फेब्रुवारी रोजी मन मंदिरा या झी टॉकीज न स्मृतिदिनानिमित्त फेम भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन परिवारातर्फे करण्यात आले आहे. तर सध्या सर्वत्र आयोजन चर्चेत असलेल्या 'चला हवा येऊ द्या', वर्षांपासून ‘होऊ द्या वायरल' या झी मराठीवरील आपासच्या विनोदी कलाकारांच्या उपस्थितीत काम बदलापुर महोत्सवाची सांगता होणार अर्थसहाय्य आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण अब अंबरनाथ काम मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री बहुउद्देशिय एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार  आहेत.


बदलापूर पश्चिमेकडील उल्हास नदी जवळील चौपाटीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींना बदलापर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील येणार आहे. या महोत्सवात खाद्यजत्रा देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यात विविध खाद्यपदार्थां बरोबरच वस्तू देखील खरेदी करता येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जत्रा देखील भरणार असल्याने या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी बदलापुरकर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक वामन म्हात्रे यांनी केले आहे.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...