बदलापूर : 27 फेब्रुवारी, मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेतील सौदर्यंस्थळे आणि समृद्धी दाखवणारा अप्रतिम कार्यक्रम ‘शब्दांच्या गावा जावे’ या अनोख्या कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आयोजक भाजपचे नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली आहे.
शब्दांचे व्यक्तीमत्व, स्वभाव, प्रकार, गमती जमती आणि त्यांचे सौंदर्य यावेळी प्रसिद्ध निवेदिका सौ. दिपाली केळकर या आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत सादर करणार आहेत. गुरूवार ता. 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता, कवी कुसुमाग्रज साहित्य नगरी, स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली, अटलबिहारी वाजपेयी मार्ग, बदलापूर पूर्व येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या शहरातील महनीय व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात येणार असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितले. मराठी भाषा आणि त्याचे शब्दांचे सौंदर्य पाहण्यासाठी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी शिंदे यांनी केले आहे.