पुढील 15 दिवस अत्यंत कसोटीचे, जिथं आहात तिथंच थांबा; मुख्यमंत्र्यांचा सल्ला


मुंबई : कोरोना व्हायरस आतापर्यत बेरीज करत होता. आता मात्र तो पुढच्या म्हणजेच धोक्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. कोरोना व्हायरस आता गुणाकार करत आहे. त्यामुळे पुढचे १५ दिवस अत्यंत कसोटीचे, परीक्षेचे असून जिथं आहात, तिथंच थांबा.  घराबाहेर पडू नका, घरातच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन आणि कडकडीची विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'फेसबुक लाइव्ह'च्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. आता आपण कोरोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहोत. त्यामुळे पुढचे 15 दिवस आपल्या सर्वांसाठीच अत्यंत कसोटीचे आहेत. या काळात डगमगून जाऊ नका. या संकटाला धैर्याने सामोरे जा. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा. नियमांचं काटेकोरपणे पालन करा. घराबाहेर पडू नका. रस्त्यावर गर्दी करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...