येस बँकेवर आर्थिक निर्बंध; ५० हजार रुपयेच काढता येणार

रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध घातले असून खातेदारांना आता ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. ५० हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना फक्त वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागेल.


येस बँकेची पत ढासळल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. SBI चे माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. खातेदारांनी घाबरू नये, असं आवाहन रिझर्व्ह बँकेने केलं आहे. आज संध्याकाळी सहा वाजेपासून येस बँकेवर निर्बंध लागू करण्यात आलेत. पुढच्या महिन्यात ३ एप्रिलपर्यंत हे निर्बंध राहतील, असं अध्यादेशात म्हटलं आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...