Fwd: ब्राह्मण सभेचा वर्धापन दिन संपन्न

अंबरनाथ  :ब्राह्मण सभेचा २९ फेब्रुवारी व १ मार्च असा दोन दिवसीय वर्धापनदिन सोहळा उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. यंदाचे  सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सोहळ्यात राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता तबला वादक कु. अथर्व लोहार आणि शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक पंडित दिनकर पणशीकर यांचा तसेच अंबरनाथमधील संगीत तसेच नॄत्य क्षेत्रातील मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.


      २९ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या सोहळ्याला मनोरंजनात्मक गाण्यांच्या कार्यक्रमानेही उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.१ मार्च रोजी श्रीसत्यनारायणाची महापूजा करण्यात आली.  वयाची  ७५ वर्षे पूर्ण केलेल्या आणि वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या जोडप्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी समाजसेविका डॉ.रेवती जठार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्रीकांत कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाह श्रीकांत लिमये, उपाध्यक्ष मधुसूदन मेहेंदळे, सहकार्यवाह माधुरी आठवले, सह कोषाध्यक्ष सौंदर्या जोशी, विश्वस्त रमेश भाटे, पांडुरंग रानडे, अॅड. क्षीरसागर, रविंद्र हरहरे यांच्या सह महिला शाखेच्या अध्यक्षा वर्षा प्रभूदेसाई, सचिव हेमलता गांगल आणि अन्य पदाधिकारी यांनी दोन दिवसीय वर्धापनदिन सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...