पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड  यांनी आज पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली.  तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होतील. तर दहावीच्या परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकाप्रमाणेच होतील. 


शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत.


दहावीचे दोन पेपर बाकी आहेत. 21 तारखेला इतिहास आणि नागरिकशास्त्र तर 23 तारखेला भूगोलचा पेपर आहे. हे दोन्ही पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे.


पत्रकार परिषदेत महत्वाचे मुद्दे



  • पहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द

  • नववी ते अकरावी  – 15 एप्रिलनंतर परीक्षा

  • दहावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील.

  • पेपर तपासणी 31 मार्चपर्यंत सध्या तरी थांबवण्यात येईल

  • पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गुण संकलन करुन निकाल दिला जाईल

  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम (दहावी वगळून)


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...