राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये या 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत परिपत्रकात सूचित करण्यात आले आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी आणि नागपूर या शहरांमधील जिम, स्विमिंग पूल, चित्रपटगृहं बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच राज्य सरकारने जाहीर केला आहे. आता करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर केली आहे.