
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेसोबत संवाद साधला. लोकांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी हा संवाद साधला आहे. यावेळी प्रशासनानं दिलेल्या सूचनांव्यतिरीक्त इतर कोणत्याही सूचनांचं पालन करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सरकारला सहकार्य करण्याचं आवाहनही जनतेला केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अंबरनाथ येथील डेन एबीसी केबलच्या अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, खानावळी बंद तीन दिवसांसाठी बंद केलेल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत मात्र अनेक विद्यार्थी हॉस्टेल किंवा अन्य ठिकाणी वास्तव्याला आहेत. अशा परिस्थितीमध्ये या तीन दिवसांत एकही शाळकरी विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी *एबीसी अन्नपूर्णा* योजना सुरू केली आहे. यामध्ये अंबरनाथ ते नेरळ परिसरातील कोणत्याही शालेय विद्यार्थ्यांना जेवणाची गरज भासल्यास त्यांनी डेन एबीसी केबल यांना संपर्क साधून कुठे आणि किती जेवण हवे आहे हे सांगावे. मागणी नुसार जेवण थेट पोहचविण्यात येणार आहे.
डेन एबीसी केबलच्या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
किरण सासे -8698880101
एबीसी मदतकेंद्र - 0251 2600601