देशात २१ दिवसांचा ल़ॉकडाऊनः पंतप्रधान नरेंद्र मोदी


एक दिवसाच्या जनता कर्फ्यूला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार. जगभरातील बलवान देश या महामारीमुळे हताश झाले आहेत. या देशाकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. परंतु त्यांची तयारी आणि प्रयत्नानंतरही या देशांत आव्हान कायम आहे. अशा सर्व देशातील परिस्थितीचा दोन महिन्यातील घडामोडीचा अभ्यास केला असता असे दिसते की या महामारीवर मात करण्यासाठी आपल्या घरा बंद राहावे. या शिवाय दुसरा पर्याय नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांच्या संक्रमणाला तोडणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर ठेवण्याची गरज आहे. सोशल डिस्टंगिक सर्वांसाठी आहे. परिवारातील सर्व सदस्यांसाठी आहे. काही लोकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे आपल्याला किंवा आपल्या मुलांना, मित्रांना परिवारासह संपूर्ण देशाला मोठ्या संकटात टाकू शकते. ही बेपर्वाही सुरू राहील्यास भारताला याची मोठी किंमत मोजावी लागेल. याची किमंत किती मोजावी लागेल, याचा अंदाज बांधणे कठिण जाणार आहे.


मागील दोन दिवसांपासून विविध राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. राज्य सरकारच्या आदेशाचे कडेकोड पालन करण्याची गरज आहे. आरोग्य विभागाच्या सूचनांचे सर्वांनी पालन करण्याची गरज आहे. या अनुषंगाने आज रात्री बारा वाजल्यापासून संचारबंदी जारी करण्यात येत आहे. संपूर्ण देशाला वाचवण्यासाठी संपूर्ण देशात ल़ॉकडाऊन करण्यात येत आहे. रात्री बारानंतर घरातून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात येत आहे.


प्रत्येक घर, गल्ली, मोहल्ला बंद करण्यात येत आहे. जनता कर्फ्यूपक्षा हा निर्णय महत्वपूर्ण आहे. या लॉकडाऊनमुळे देशाला आर्थिक फटका बसणार आहे. परंतु प्रत्येक भारतीयांना वाचविणे हे सरकारचे प्राधान्य आहे. ही माझी आणि भारत सरकारची, राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या संकटाच्या प्रसंगी जिथे असाल तिथे रहा. सद्यस्थिती पाहता देशात लॉकडाऊन २१ दिवसांचा असेल.


पुढील २१ दिवस महत्वाचे आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवस महत्वाचे आहेत. हे २१ दिवसांत आपण सावरलो नाही तर आपण २१ दिवस मागे जाण्याची शक्यता आहे. एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून हे आवाहन करत आहे.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...