लॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा

बदलापूर :- कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने  देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. वाहतूक व्यवस्थाही देखील प्रभावित झाल्याने बदलापूरमध्ये औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. लॉकडाऊनमुळे अन्य शहरांसह राज्यांमधून येणारा औषधांचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे आता मधुमेह, रक्तदाब यावरील औषधे मिळणे कठीण झाले आहे.

२४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर २१ दिवसांचा लॉक डाऊन ची घोषणा केली. लॉक डाऊन उलटून आता एक आठवडा झाला असून लॉक डाऊन चे परिणाम आता जाणवू लागले आहेत.

बदलापूरमध्ये मधुमेह, रक्तदाब यासारख्या अनेक गंभीर स्वरुपाच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे.

स्थानिक बाजारपेठेतील अनेक मेडिकलमध्ये औषधांचा साठा संपला असून . नवीन मागणी नोंदवूनही औषधांचा पुरवठा कंपन्यांकडून होत नाही. नवीन मागणी नोंदविलेल्या औषधांचा पुरवठा कॅश पेमेंट या अटीवर केला जात असल्याची माहिती एका मेडिकल स्टोअर्स मालकाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर दिली. इतर काळात आम्ही घाऊक व्यापाऱ्यांना सांभाळून घेत असतो आणि आता अशा परिस्थितीत त्यांच्याकडून होणारी अडवणूक चुकीची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.त्याशिवाय औषधी कंपन्यांच्या उत्पादनावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. कंपन्यांमध्ये लॉकडाऊनपूर्वी उत्पादित झालेला साठाही वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने स्थानिक पातळीपर्यंत पुरवण्यात अडचणी येत आहे.

मधुमेह आणि रक्तदाब करिता लागणारी औषधे नियमित घेणे गरजेचे आहे तसेच त्यामध्ये खंड पडत काम नये अशा परिस्थितीत मेडिकल स्टोअर्स मध्ये औषधे उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे तरी याप्रकरणी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...