करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने प्लाझ्माची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संकलित प्लाझ्मा आणि रुग्णांची संख्या यांचे व्यस्त प्रमाण झाल्यामुळे प्लाझ्मा मिळणे अवघड झाले आहे. अशावेळी बदलापूर येथील भोईर बंधूंनी आपली सामाजिक बांधिलकी जपत प्लाझ्मा दान केले.
बदलापूर शहरात गेल्या सतरा वर्षांपासून काका गोळे फाऊंडेशन रक्तदान शिबीर चळवळ राबवित आहे. करोनाच्या या महामारीत रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे लक्षात घेऊन काका गोळे फाउंडेशनने दर महिन्याला साखळी रक्तदान शिबीर सुरु केले आहे. गेल्या सहा महिन्यात सहाशेच्या वर बाटल्या रक्त जमा करण्यात यश मिळाले आहे. करोनामुळे रुग्णांना प्लाइमाची आवश्यकता भासू लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन आता काका गोळे
फाउंडेशनच्या माध्यमातून प्लाझ्मा दान मोहीम हाती घेण्यात आली आहे. काका गोळे फाउंडेशन ने केलेला आवाहनाला प्रतिसाद देत कुळगाव बदलापूर नगर परिषद भाजप नगरसेवक किरण भोईर यांनी काही दिवसांपूर्वी प्लाजमा दान करीत पुढाकार घेतला होता, आपल्या ज्येष्ठ बंधूंचा कित्ता गिरवीत किरण भोईर यांचे बंधू विशाल भोईर , अमित भोईर
यांनी आज प्लाझ्मा केले. त्यांच्यासोबतच दिनेश कथोरे यांनीही प्लाझ्मा दान केले.भोईर बंधू आणि दिनेश कथोरे यांनी केलेल्या प्लाझ्मा दानामुळे किमान 6 करोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे. हे आहे करोना रुग्णांसाठी केलेलं खरे व शाश्वत काम असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने सर्व स्तरातून उमटत आहे.
करोनामधून बरे झालेले २५ ते ५० वयोगटातील पुरुष प्लाझ्मा दान करू शकतात. करोनातून मुक्त झालेल्या रुग्णाने प्लाझ्मा दान केल्यास त्यातून करोना रुग्णांना फार मोठा दिलासा मिळू शकतो. याबाबतीत अगदी सुरुवातीपासून पुढाकार घेतलेल्या बदलापूर येथील काका गोळे फाउंडेशनने मुंबईच्या केईएम रुग्णालय तसेच कल्याणच्या अर्पण
रक्तपेढीच्या सहकार्याने वसई ते बदलापूर परिसरातील ८० गरजू रुग्णांना आतापर्यंत प्लाइमा उपलब्ध करून दिला आहे.
#plasmadonation2021
#बदलापूर
#Badlapur
#badlapurkar
#COVID19