दहावी आणि बारावीच्या बोर्डाचया परीक्षा पुढे ढकलल्या
बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस आणि दहावीची परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्यण घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याची माहिती दिली. विद्यार्थ्यांकडून याबाबतची मागणी केली जात होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच दहावी बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला गेला.