रमेशवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली होती . बदलापूर (प) चे वरीष्ट पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केली .तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन केले . तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पंचशिल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मनोहर भालेराव यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अपर्ण केली या वेळी अशोक गजरमल, रोकडे. आदी नी अभिवादन केले
बदलापूर नगरपालिकेत डॉ. आंबेडकर जयंती साजरी
कुळगाव बदलापूर नगरपालिका कार्यालयात कोरोनाविषयक नियमांचं पालन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली .मुख्याधिकारी दीपक पुजारी ,माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे , माजी नगरसेवक श्रीधर पाटील यांनी या वेळी अभिवादन केले
मोहनानंद येथे जयंती साजरी
शिवेसना शाखा मोहनानंद नगर मांजर्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . बौद्धाचार्य डॉ. नंदकुमार कांबळे यांनी सुत्रपठन करून अभिवादन केले यावेळी अॅड तुषार साटपे, दिनेश शिंदे , रमेश पिंगळे आदी नी अभिवादन केले.