पॉईंटमन मयूर शेळकेच्या धाडसाचे रेल्वे मंत्र्यांकडून कौतुक

वांगणी :-  वांगणी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर एक अंध महिला शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुलासह चालत होती. याचवेळी, तो मुलगा प्लॅटफॉर्मच्या कडेला गेला आणि तोल जाऊन तो रेल्वे रुळावर पडला. एक्स्प्रेस ट्रेन अवघ्या काही सेकंदातच तिथे येणार होती. चिमुकला रेल्वे रुळावर पडल्याचं पॉईंटमन मयूर शेळके यांनी पाहिलं. एक्स्प्रेस समोर दिसल्याने क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला प्लॅटफॉर्वर घेतलं. अवघ्या काही सेकंदांनी मुलगा आणि पॉईंटमनचे प्राण वाचले. 

पॉईंटमन मयूर शेळके यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वेगवान एक्स्प्रेसच्या दिशेने धाव घेत चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील मयूर शेळके च्या धाडसाचे कौतुक केले आहे. 

पियुष गोयल यांनी Very proud of Mayur Shelke, Railwayman from the Vangani Railway Station in Mumbai who has done an exceptionally courageous act, risked his own life & saved a child's life.असे ट्विट करून मयूर शेळके यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...