बदलापूर करांच्या सेवेत दाखल झाले आहे ... मसाल्यांचे परिपूर्ण दालन श्री आशापुरा मसाला ...एकदा अवश्य भेट द्या

भारतीय जेवण इतकं चवदार असतं कारण आपल्या जेवणांमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर असतो. भारतातल्या सर्व प्रांतांमध्ये मसाल्यांचा मुबलक वापर केला जातो. मग त्या मसाल्यांचं स्वरूप वेगळं असेल किंवा घटक पदार्थही वेगळे असतील, पण मसाले वापरले जातात इतकं नक्की. प्रांतागणिक मसाल्यांमधले घटक पदार्थ बदलतात. त्यातही सुके मसाले आणि ताजे ओले मसाले असं वर्गीकरण असतंच. सुके मसाले किंवा साठवणीचे मसाले ही भारतीय खाद्यसंस्कृतीची खासियत आहे.
मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ, वेलची, तमालपत्र, जायपत्री, नागकेशर, चक्री फूल, दगड फूल, मसाला वेलची, शहाजिरं हे मसाल्याचे, कमी तिखट, जास्त तिखट, अधिक लाल, कमी लाल अशा किती तरी मिरच्या, मसाल्यांमध्ये वापरले जाणारे इतर पदार्थ, म्हणजे धणे, जिरे, मेथी दाणे, हळद, हिंग, तिखट, बडिशेप आदी कितीतरी मसाल्याचे पदार्थ बादलापूर करांना एकच छताखाली आशापुरा मसाल्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बदलापूर बेलवली येथे श्री रामतीर्थ अपार्टमेंट शॉप नंबर ३/४ येथे श्री आशापुरा मसाला सुरू करण्यात आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना दुकानाचे मालक विजयसिंग जडेजा यांनी सांगितले की, दोन वेळच जेवण पोटभर मिळाव ह्यासाठी आपण सर्वजण काम करत असतो, घरी आईच्या किंवा बायकोच्या हातचं जेवण जेऊन तृप्त होण्यात मजा काही औरच असते....आईच्या किंवा बायकोच्या हातचा जेवणात चव येण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा घटक म्हणजे मसाला...आपल्या घरी आपण कोणता मसाला वापरतो त्यावर जेवणाची चव ठरते..बऱ्याचदा ह्या मसाल्यासाठी आपल्याला दूरवर जावं लागत किंवा घरगुती मसाला बनवताना धावपळ करावी लागते. हीच अडचण लक्षात घेऊन आम्ही आपल्या सर्वांसाठी एकच ठिकाणी अनेक प्रकारचे मसाले घेऊन आलो आहोत, आता आपल्याला मसाले घेण्यासाठी दूरवर जाण्याची गरज नाही, आपल्या बदलापूर शहरातच आपल्याला अनेक प्रकारचे मसाले योग्य दरात मिळतील ह्याची खात्री देतो.
गेली अनेक वर्ष ह्या व्यवसायात असल्याने  ग्राहकांची आवड निवड लक्षात घेऊन मालवणी, आगरी, कोळी व इतर अनेक प्रकारचे उत्तम प्रतीचे मसाले आमच्याकडे विक्रीसाठी आहेत, आपण नक्की एकदा भेट देऊन आमचे मसाले घेऊन आपल्या जेवणाची चव बदलून पहा, आपल्याला नक्की आवडेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमचा पत्ता: 
श्री आशापुरा मसाला,
शॉप न ३/४,
श्री रामतीर्थ अपार्टमेंट,
बेलवली, बदलापूर (प)
९०२९००४१६४
८३५५८४५४५२

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...