कोरोना रुग्णांना कोविड-१९ महामारीसाठी लागणारे कोणतेही औषधे उपलब्धतेबाबत काही मदत हवी असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासन, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ मुल्यालयाचे Helpline No. 1800-222365 किंवा कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका, यांगणी व मुरबाड तालुका मर्यक्षेत्राचे औषध निरीक्षक नितीन आहेर (मो.नं. ९२२४३६२०८१), संदीप नरवणे (मो.नं. ९८३३१५२०९७) व विलास तासखेडकर (मो.नं. ९९६७७८२८ ६२) यांना संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे. त्यांच्याकडून पूर्णपणे सहकार्य केले जाईल.असे आश्वासन विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका, वांगणी व मुरबाड तालुका, परिमंडळ-६, अन्न व औषध प्रशासन, ठाणे विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोविड रुग्णांसाठी लागणाऱ्या मेडीकल ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याकरीता योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या मोठया प्रमाणात खाजगी रुग्णालयांमध्ये तुटवडा असून तो कमी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे राज्याचे मा. मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे व मा. आयुक्त श्री. अभिमन्यू काळे यांनी ज्युबिलंट जेनेरीक्स लिमिटेड, सिप्ला लिमिटेड, डॉ. रेड्डी, सन फार्मा, हेटेरो हेल्बकेअर, जायरडम हेल्थकेअर व माग्रलैन औपधी कंपन्यांचे प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांना महाराष्ट्रात पुरेसा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करण्याबाबत सूचित करण्यात आले. त्याअनुषंगाने रेमडेसिबीर इंजेक्शनचा पर्याप्त साठा खाजगी कोविड रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. याबाबत सर्व रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादक कंपन्यांना मा, आयुक्त यांनी दि. ০७/०४/२०२१ रोजी आदेश दिलेले आहेत. त्यात नमूदप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादक संस्था साठा उपलब्ध करून देणार आहेत
. सद्यस्थितीत मेडीकल ऑक्सिजनचाही साठा पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहे .
- रक्त व रक्तघटकाचा तुटवडा होऊ नये याकरिता सर्व रक्तपेढयांना योग्य काळजी घेऊन रक्तदान शिबीर घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या कामी त्यांना औषध विक्रेते संघटना सर्वतोपरी मदत करीत आहे.
- सर्व किरकोळ व ठोक औषध विक्रेत्यांकडे कोविड-१९ महामारीसाठी बापरण्यात ग्रेणारे इतर औषधे जसे कॅविपिरावीर ँ्लेट, अॅजिश्रोमायसीन टॅब्लेट, डॉक्सीसायक्लिन टॅब्लेट, पॅरासिटामोल टॅब्लेट,
व्हिटामीन-सी, मल्टीव्हिटामिन टॅब्लेट व इतर प्रतिजैविक औषधे यांचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे - औषध विक्रेत्यांना त्यांचेकडे येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मास्क घालणे बंधनकारक असल्याबाबत सूचित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणेबाबत सर्व रुग्णांना प्रबोधन करणेबाबतही सूचित करण्यात आलेले आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.