बदलापुरात नव्या कोरोना बाधित रुग्ण संख्येत मोठी घट, कोरोनातुन मुक्त झालेल्यांची संख्याही वाढली


बदलापूर :- शहरातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस घटत असून आज नव्या कोरोना बाधित रुग्ण संख्येत मोठी घट झाली असल्याचे दिसून येत आहे. पालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार बदलापूर शहरात आज आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५७ असून २७२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करून बरे होऊन घरी आले आहेत.सलग तिसऱ्या दिवशी बदलापूर शहरात शंभरपेक्षा कमी रुग्ण आठवण आले आहेत ही बदलापूरकरांसाठी दिलासादायक बाब आहे.
 महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये आज बदलापुरात काहीसा आशेचा किरण दिसलेला आहे. आज मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. आज शहरात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. र गेल्या २४ तासात ५७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. पण दिलासादायक बाब म्हणजे  आज तब्बल २७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...