बदलापुरात लसींचा पुरवठा करा, आशिष दामले यांची आरोग्य मंत्र्यांकडे आग्रही मागणी

बदलापूर :- कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. परंतु लसीच्या उपलब्ध साठ्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना लसीपासून वंचित राहावं लागत आहे.  शहरातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, तसेच लसीकरणाचा वेेग मंदावू नये याकरीता बदलापूर शहरास जास्तीच्या 
प्रमाणात लस पुरविण्यात  यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी  आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाशिवाय पर्याय नाही. हे सिध्द झाले आहे आणि त्याकरिता केंद्र शासन तसेच राज्य शासन यांच्यामार्फत लसीकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात फ्रंट लाइनर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले, त्यानंतर 60 वर्षांवरील नागरिकांचे आणि आता 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व  18 ते 44 वर्ष वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. बदलापूर शहरात दुबे रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय या दोन ठिकाणी शासनामार्फत मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तथापि या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने लसीकरणांचा वेग मंदावत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक  त्रासाला सामोरे जावे लागते आहे. हीच बाब लक्षात घेऊन कॅप्टन दामले यांनी आरोग्य मंत्री यांची भेट घेतली.आणि  शहराकरिता
लवकरात लवकर बदलापूरला लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी  केली.
यावेळी बदलापूर शहरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे अशी  आग्रही मागणी देखील  केली. शहराध्यक्ष यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला. कुळगाव बडलापुर नगरपालिका हद्दीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याकरिता आवश्यक ती प्रक्रिया जलद गतीने करण्यात येईल असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच बदलापूर शहरातील कोरोना स्थितीचा आढावा देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. जाणून घेतला. 

#NCP
#Badlapur

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...