रुपाली चाकणकर आणि अमृता फडणवीस यांच्यात ट्विट वॉर



राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या मध्ये पुन्हा एकदा ट्विट वॉर सूरु झाले आहे. जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती ! असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलय.  त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही एक खोचक ट्विट करून अमृता फडणवीस यांना टोला लगावला. जंगल की शेरनी शिकार करती है…सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन ! अशा खरमरीत शब्दांत त्यांनी टीका केली आहे. यापूर्वी देखील या दोघींमध्ये असेच ट्विट वॉर रंगलेले पाहायला मिळाले होते.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...