उल्हासनगर :- १९ वर्षांच्या सेवाकाळात १२५ बक्षिसे, अतिउत्कृष्ठ कामगीरीच्या १२ नोंदी व ११ प्रशस्तीपत्रे अशी कामगिरी करणारे अधिकारी आहेत त्यांचे नाव आहे शशिकांत जाधव आणि सध्या ते २०१५ रोजीपासुन राज्य गुप्तवार्ता विभाग, ठाणे येथे Asst. Intelligence Officer (सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी) पदावर कार्यरत आहेत.
लहानपणापासून देशसेवेची आवड असलेल्या शशिकांत जाधव, हे दि. १६/११/२००० रोजी ठाणे शहर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर भरती झाले.
त्यांचे शिक्षण बी.कॉम. एल.एल.बी. असे झाले, त्यानंतर त्यांना संगणकाचे चांगले ज्ञान असल्याने प्रशिक्षण
करून आल्यानंतर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रान्च चे CCTS या शाखेत व त्यानंतर जानेवारी २००७ मध्ये अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे येथे नियुक्ती देण्यात आली. त्यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो येथे असतांना अनेक यशस्वी सापळा प्रकरणात सहभाग घेतला. त्यात बरेच वर्ग-१ व वर्ग-२ अधिका-यांचे यशस्वी सापळा प्रकरणात होते तसेच त्यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या चौकशीची प्रकरणे चांगल्या प्रकारे पुर्ण केली. त्यांचा अॅन्टी करप्शन ब्युरो मधील अत्युत्कृष्ठ कामगीरी करीता तत्कालीन मा. पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो. ठाणे यांनी एकुण ११ प्रशस्तीपत्रे व बक्षिसे देवुन गौरव केला आहे.
त्यानंतर ते जानेवारी २०१५ पासून राज्य गुप्तवार्ता विभाग ठाणे येथे 'स.गु.अ.' या पदावर कार्यरत आहेत. या विभागात त्यांना त्यांचे चांगल्या कामाबददल बरीच बक्षिसे देण्यात आली आहेत. त्यातच २०१५ त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान कर्तव्य अत्यंत कौशल्याने पार पाडल्याने बक्षिस व प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले आहे. ते अत्यंत शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व मेहनती असुन त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यांना आतापर्यंत १९ सेवाकाळात १२५ बक्षिसे, अतिउत्कृष्ठ कामगीरीच्या १२ नोंदी व ११ प्रशस्तीपत्रे मिळालेली आहेत.
त्यांचे अतिउत्कृष्ठ कामगीरीचा व विशेष गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्यांना नुकतेच मा. पोलीस महासंचालकांचे 'सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र पुरस्कार देण्यात आलेला आहे.