बदलापूर :- येथील कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयास बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे व्ही जी सेव्हंटी व्हेंटिलेटर तसेच पीपीई किट भेट देण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या लोकार्पणत सोहळा कार्यक्रमात मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याकडे व्हेंटिलेटर आणि पीपीई किट सुपूर्द करण्यात आले.
बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सामाजिक हिताचे, लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. सध्या कोरोना संकटाचा मुकाबला करत असतांनाच व्हेंटिलेटर व पीपीई किटची कमतरता भासू नये यासाठी सामाजिक भान जपत बदलापूर नगर परिषदेस आवश्यक असे व्हेंटिलेटर व पीपीई किटस देण्यात आले. मुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोरोना संकटाच्या काळात सुरू असलेल्या कामांची माहिती शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी याप्रसंगी अवगत करून दिली.
याप्रसंगी बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आशिष दामले यांच्यासह मा.नगरसेवक, प्रभाकर पाटील उपस्थित हे ही उपस्थित होते.
#Covid19
#Badlapur_fights_Corona
#NCP