बदलापूर शहरात देखील भाजप कार्यकर्ते आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले होते.
शहरात ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष गणेश भोपी आणि महिला अध्यक्षा स्वाती सूरज बेळंके ह्याच्या अध्यक्षतेखाली व आमदार श्री किसन जी कथोरे ह्यांच्या नेतृत्वात बदलापूर पश्चिम येथे चक्का जाम आंदोलन करून सरकार विरोधात असलेला असंतोष व्यक्त करण्यात आला.
आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्त्याना अटक केली.
हया आंदोलनात बदलापूर शहरातील भाजपचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते, अशी माहिती गणेश भोपी यांनी आदर्श बदलापूरला दिली.