राज्यात हळूहळू कोरोना परिस्थिती नियंत्रणात येते असली तरी डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. देशात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीत बदल केला आहे. या नियमावलीनुसार सोमवारपासून राज्यातील सर्व जिल्हे पाच टप्प्यापैकी तिसऱ्या टप्प्यात असणार आहे.
म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील नियम संपूर्ण राज्यात सोमवारपासून लागू होणार आहेत. राज्यातील कोणताही जिल्हा तिसऱ्या टप्प्याच्या खाली नसणार आहे. म्हणजेच आता राज्य आता मिनी लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान राज्यातील जिल्ह्याची विभागणी पाच टप्प्यात होत होती. दर शुक्रवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पाच टप्प्यात विभागले जात होते.
त्याचप्रमाणे आज देखील आढावा घेऊन सरकारने जारी केलेल्या नियमावलीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला गेला. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होणार आहे. म्हणजे सर्व जिल्हे, महापालिका तिसऱ्या टप्प्याच्या वरती असणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या खाली नसणार आहेत.
*काय असतील तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध?*
* अत्यावश्यक दुकाने दुपारी ४ पर्यंत खुले राहतील.
* तसेच इतर दुकाने दुपारी ४ पर्यंत खुले राहतील. पण शनिवार-रविवारी पूर्णपण बंद असतील.
* मॉल, चित्रपटगृह बंद.
हॉटेल्सना दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्याची परवानगी, परंतु शनिवार-रविवार बंद.
* उद्याने, मैदाने, जॉगिंग पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत सुरू राहतील.
सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्यास परवानगी.
* खासगी कार्यालये (परवानगी मिळाल्यास) ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.
* चित्रीकरणाला बायो बबल वातावरणात परवानगी.
* संध्याकाळी ५ वाजल्यानंतर बाहेर जाण्यास परवानगी नाही.
सार्वजनिक वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील. उभ्याने प्रवास करता येणार नाही.
* जीम, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
* लग्नाच्या हॉलला ५० टक्के क्षमतेने खुले राहण्यास परवानगी देण्यात येईल. कमाल १०० लोकांची उपस्थितीत राहण्यास परवानगी असेल.
* अंत्यसंस्कार विधीला २० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल....!