पेट्रोलची शंभरीपार ! मोदी सरकारला मॅन ऑफ द मॅच; बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची पोस्टरबाजी


भाजपच्या सत्ता काळातत इंधन दरवाढीचा आलेख चढाच राहिला आहे.  आता पेट्रोल ने शंभरी पार केली आहे तर डिझेल चे दर देखील लवकरच शंभरी गाठण्यासाठी आतुर आहे . त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनोखे फलक  शहरात लावले आहेत. या फलकांवर अच्छे दिनाच्या शुभेच्छा देऊन  मोदी सरकारला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला आहे.
पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती गगनाला भिडत आहेत. यात सर्वसामान्य जनता होरपळून जात आहे. ह्या जाचक दरवाढीच्या निषधार्थ  मोदी सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी शहरात पेट्रोल नॉट आऊट  १०४ असे पोस्टर लावून पेट्रोलियम पदार्थ दरवाढीस कारणीभूत झालेल्या मोदी सरकारचा निषेध करण्यात आला आहे. 
या पोस्टरच्या  माध्यमातून दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीबाबत केंद्र सरकारचा निषेध करत हेच का अच्छे दिन अशी विचारणा करत आली आहे तसेच अच्छे दिनाच्या शुभेच्छाही पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. पेट्रोलियम पदार्थाच्या वाढीव किमतीस कारणीभूत ठरलेल्या सरकारला मॅन ऑफ द मॅच देण्यात येत असल्याचे ही पोस्टर मध्ये निर्देशित केले आहे.
अविनाश देशमुख यांनी उभारलेल्या पोस्टरची  शहरात चर्चा होत आहे.

Nationalist Congress Party - NCP

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...