अंबरनाथ :- कोविड लसीकरण केंद्रावर लस मिळवण्यासाठी एकीकडे नागरीकांना दररोज झगडावे लागत आहे , असे असतांना करवले लसीकरण केंद्रावर मात्र लस न घेताही लसीकरणाची नोंद आणि कोविन अपवर लस घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील घोळ आणि यंत्रणेतील भोंगळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर पूर्वी केवळ शहरी भागातील आणि मुंबई उपनगरातील नागरीकांकडून लसीकरणाचा लाभ घेतला जात होता. त्यात ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये लसीकरणाबाबत असलेली उदासिनता आणि भीती यामुळे ग्रामीण भागातील केंद्राचा खर्या अर्थाने येथील नागरीक लाभ घेत नव्हते. मात्र दुसर्या लाटेनंतर ग्रामीण भागातील नागरीकाचाही लसीकरणाबाबत प्रतिसाद वाढला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर शहरातील केंद्राप्रमाणे गर्दी वाढू लागली आहे. मात्र करवले येथील केंद्रावर लस न घेताही लसीकरणाची नोंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
करवले येथे राहणारे अशोक जाधव यांनी ऑनलाईन पद्धतीने लसीकरणाची नोंद केली होती. ते मंगळवारी केंद्रावर लस घेण्यासाठी गेले असता, त्यांचे लसीकरण आधीच झाल्याचे त्यांना केंद्रावरून सांगण्यात आले. त्याबाबतचा संदेशही त्यांच्या जाधव यांनी ऑनलाईन पद्दतीने लसीकरणाची नोंद केली होती. ते मंगळवारी केंद्रावर लस घेण्यासाठी गेले असता, त्यांचे लसीकरण आधीच झाल्याचे त्यांना केंद्रावरून सांगण्यात आले. त्याबाबतचा संदेशही त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाला होता. त्यामुळे आपण लस न घेताच आपली नोंद झाल्याचे पाहून जाधव यांना धक्का बसला. त्यामुळे आपल्या हक्काची लस इतर कोणी घेतल्याने लसीच्या दुसऱ्या डोसपासून वंचित राहण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी त्यांनी केंद्रावर तक्रार केली असता, त्यांना दोन दिवसांनंतर लस दिली जाईल असे आश्वासन केंद्रावरून दिल्याचे जाधव यांनी सांगितले.
याबाबत लसीकरण केंद्रावरील अधिकारी विजया पोडे यांना विचारणा केली असता, सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असून याबाबत वरिष्ठांना कळवण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मात्र या भागात आणखी दोन ते तीन व्यक्तीसोबत असा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नोंदणी करणार्या व्यक्तीच्या मोबाईलवर येणारा गोपणीय क्रमांक केंद्रावर दाखवल्यानंतरच लसीकरण होत असतांना, या प्रकरणामुळे गोपणीयतेचा भंग आणि गैरवापर होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत अधिक तपास करण्याची मागणी केली जात आहे.