दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या शुक्रवारी दि.१६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. दहावी निकालाबाबतची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.
”महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ. १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल.” असे वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा राज्य शिक्षण विभागानं निकालाच्या गणितासाठी पर्यायी मुल्यांकन निकष लावले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मुल्यांकन निकषानुसार, वर्ग ९ ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल तयार करण्यात आला आहे.