उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती..... एक क्लीक वर ....

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल ...
बदलापूर :-  येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या वतीने बदलापूर शहरात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आशिष दामले यांनी बदलापूर शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम बदलापूर करांकरिता राबविले जात आहेत. 
लसीकरण मोहीम
शहरातील नागरिकांना अल्पदरात कोरूना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे युवराज प्रतिष्ठान आणि गायत्री चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून नाव नानावटी रुग्णालय च्या साह्याने 300 रुपयात कोविशिल्ड  लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त ही लसीकरण मोहीम यशस्विनी भवन येथे संपन्न होणार आहे.
रक्तदान शिबिर
राज्यात रक्तची कमतरता भासत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यासह अनेक मान्यवरांनी नागरिकांना रक्तदान करा असे आव्हान केले आहे ह्या आव्हानाला प्रतिसाद देत बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बदलापूर स्टेशन जवळील बस स्टॉप लगत असलेल्या गणेश कॉम्प्लेक्स या संकुलात हे रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे.शुक्रवार  दि. २३ जुलै, सकाळी ९ ते दु. २.३० पर्यंत हे रक्तदान शिबिर असणार आहे. रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान करावे असे आव्हान आशिष दामले यांनी केले आहे.

समर्पित साहित्य गौरव ग्रंथालय आता डिजिटल स्वरूपात

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे 'साहित्य गौरव' ग्रंथालय स्थापनेपासूनच वाचकांची पहिली पसंद ठरत आहे. येथे उपलब्ध असलेली विपुल व दुर्मिळ ग्रंथसंपदा, वाचनासाठी मुबलक जागा, विद्यार्थ्यांसाठी वेगळी सोय, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक पुस्तके असे बरेच काही या ग्रंथालयात आहे.

परंतु आताच्या डिजीटल युगात अनेक पुस्तके ऑनलाईन उपलब्ध असतात, ही पुस्तके वाचण्यासाठी किंडल ची मागणी वाचकांकडून वारंवार करण्यात येत होती.

हे लक्षात घेऊन  अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 6 किंडल वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. आता जगभरागील सर्व पुस्तकं 'साहित्य गौरव' ग्रंथालयात उपलब्ध आहेत असं म्हणायला हरकत नाही.
 सलाम मुंबई फाउंडेशन आणि युवराज प्रतिष्ठान च्या वतीने तंबाखूमुक्त बदलापूर मोहीम 
बदलापूर शहरातील युवावर्ग व्यसनाच्या अधीन जाऊ नये याकरिता युवराज प्रतिष्ठान च्या वतीने गेल्या काही वर्षांपासून तंबाखूमुक्त बदलापूर ही मोहीम राबविली जात आहे. लोकांमध्ये विशेषता युवकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. याकरिता युवराज प्रतिष्ठान सलाम मुंबई फाउंडेशन सोबत काम करीत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून तंबाखूमुक्त बदलापूर या पुस्तिकेचे बदलापूर नगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी दीपक पुजारी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

दादांच्या वाढदिवसानिमित्त ताईज किचनमध्ये गुलाबजामसहित रुचकर जेवणाची मेजवानी 

आजच्याच दिवशी 3 वर्षांपूर्वी  अजितदादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'ताईज किचन'  सुरू करण्यात आले होते. आज त्याचा तिसरा वर्धापन दिन.

अजितदादांचा समाजकारणाचा वसा चालवत समाजातील गोरगरीब जनतेसाठी 2 वेळचे पोटभर आणि माफक दरात असलेले जेवण उपलब्ध केउन देण्याचे उद्दिष्ट ठेवून गेली 3 वर्ष हा उपक्रम निरंतर चालू आहे. दादांचे आशीर्वाद आणि समाजातील भल्या लोकांच्या पाठींब्यावर हे मार्गक्रमण चालू आहे. या उपक्रमाची लोकप्रियता लक्षात घेऊन राज्य शासनाने देखील शिव भोजन थाळी राज्यभर सुरू केली, त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

तुम्ही चांगलं काम करत चला, लोकं तुम्हाला फॉलो करतील हे दादांचं मार्गदर्शन  प्रत्ययास आले आहे
आज वर्धापन दिन आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त ताईज किचनमध्ये गुलाबजामसहित रुचकर जेवणाची मेजवानी आहे. सर्वांना आग्रहाचे आमंत्रण!

गरीब आणि गरजूंना अन्नधान्य किट वाटप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा मूलमंत्र दिला आहे त्यानुसार संकट काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची सेवा केलेली आहे आणि हीच भूमिका कायम ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील गरीब आणि गरजू तसेच आदिवासी बांधवांना वाढदिवसानिमित्त अन्नधान्य किट चे वाटप देखील करण्यात आले.

पावसामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांना राष्ट्रवादी तर्फे मदत

सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. बदलापुरातही जोरदार पाऊस सुरू असून पावसामुळे बदलापूर रेल्वे स्थानक येथे सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्यरात्री १२ पासून अडकली आहे. याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बदलापूर शहर पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकात धाव घेतली. गाडीतील प्रवाशांसाठी नाश्ता, पाणी यांचे वाटप केले. रात्रभर अडकून पडलेल्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला.  प्रवाशांनी बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.  

आज आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करतांना बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माझे सर्व सहकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अडचणीत धावून जात प्रवाशांना मदत केली.  


दादा, शतायुषी व्हा, निरोगी रहा!

आशिष दामले

#अजितदादा
#विकास_पुरुष
#ताईज_किचन
#कम्युनिटी_किचन
#बदलापूर
#NCP

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...