बदलापूर शहरामध्ये विविध सामाजिक संस्थांमार्फत लसीकरण मोहीम सुरू आहे आणि या मोहिमेचा लाभ शहरातील वयोवृद्ध तसेच 18 वर्षावरील नागरिक घेत आहेत. बदलापूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे तसेच बदलापूर शहर कोरोना मुक्त व्हावे याकरिता नागरिकांना परवडतील अशा दरात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. नामांकित खाजगी रुग्णालयाच्या सहकार्याने आणि आधिपत्याखाली लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ह्या मोहिमेस जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत परवानगीनंतरच लसीकरण मोहीम राबविण्यात येते. अशावेळी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतील अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून खाजगी लसीकरण मोहीम बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
भाजपच्या स्थानिक नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे लाभार्थी नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच खाजगी लसीकरण मोहीमेची सुरुवात ही भाजप खासदार कपिल पाटील यांच्या कपिल पाटील foudation मार्फत राबविण्यात आली होती याची ही आठवण करून दिली आहे. तसेच खाजगी लसीकरण मोहिमे अंतर्गत नागरिकांना सवलतीच्या दरात लस उपलब्ध होत असल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांना आत्ताच ही भूमिका घेण्याचे वेळ का आली असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
आज ही शिवसेनेचे दोन ठिकाणी लसीकरण सुरू आहे. भाजपने त्यांना खाजगी लसीकरणाबाबत काही शंका असल्यास त्यांनी फातिमा स्कुल आणि रमेश वाडी (साईबाबा मंदिर) येथे
संध्याकाळी ६ वाजे पर्यंत कधीही या दोन्ही ठिकाणी स्वतः येऊन खात्री करावी असे आहवान शिवसेने केले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी आणि नगरपालिका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम राबविण्यात येते संपूर्ण निकष पूर्ण केल्यानंतरच लसीकरण मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मिळते. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. शहर लवकरात लवकर कोरोना मुक्त व्हावे हा आमचा प्रयत्न आहे, या करिता महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आशिष दामले यांनी दिली.